गड किल्ल्याच्या बांधकामात मळलेल्या चुन्याचे महत्व.मळलेला चुना तयार करणे
गड किल्ल्याच्या बांधकामात मळलेल्या चुन्याचे महत्व. मळलेला चुना तयार करणे सध्याच्या आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानामध्ये रेडी मिक्सर हा महत्वाचा घटक आहे. स्टील, सिमेंट, वाळू, खडी, पाणी यांचे मिश्रण वापरले जाते. असे साहित्य वापरूनही इमारती पडलेल्या कोसळलेल्या आपण पाहतो. तीनचारशे वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी बांधलेली बांधकामे आजही कशीकाय शाबूत आहेत. आपले पूर्वज बांधकामशास्त्रात किती प्रगत होते यावरून लक्षात येते. चुना हे पूर्वीच्याकाळी बांधकाम साहित्य म्हणून वापरत असत. अलीकडील बांधकाम पद्धतीमध्ये चुन्याचा वापर होताना दिसत नाही. त्याएवजी सिमेंट वापरले जाते. चुना पर्यावरणपूरक टिकाऊ मजबूत असल्याने व तो गावोगावी चुनखडीच्या शेतात सहज मिळत असल्याने त्याचा पूर्वीच्या काळी वापर होत असे. बांधकामातील महत्वाचा घटक म्हणजे दगडाचे व विटांचे सांधे भरण्यासाठी लागणारा चुना. तो कसा बनवला जात असे तो पाहुयात. जिथे चुनखडीचे दगड किंवा चुनखडीची जमीन असते तेथील गाव शिवारातून चुन्याचे दगड गोळा करून मोठ्या भट्टीत चुन्याचे दगड भाजले जात असत. अशा भाजलेल्या चुन्याचे खडे पाण्यात टाकले की फसफसून ...